Raksha Khadse : त्या दोघांच्या वादात माझं सँडविच होतंय… रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच दिली कबुली; कुणावर नाराज?

| Updated on: Nov 26, 2025 | 2:16 PM

रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपची ताकद नेहमीच राहिली असल्याचे म्हटले. भाजपच्या मतांवर शिंदे गटाचा आमदार निवडून आल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. स्थानिक निवडणुका कार्यकर्त्यांच्या हिताच्या असाव्यात, असे मत व्यक्त करत त्यांनी चोपडा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच, भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करण्याचे आवाहन केले.

रक्षा खडसे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुक्ताईनगरमधील राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक निवडणुकांवर भाष्य केले. मुक्ताईनगर तालुक्यात भाजपची ताकद नेहमीच मोठी राहिली असून, बोदवड, चोपडा आणि रावेर या तालुक्यांमध्येही पक्षाचे चांगले बळ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चंद्रकांत पाटलांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीमध्ये ५०-५० जागांच्या वाटपाचा प्रस्ताव स्वीकारला गेला नाही, असे त्यांनी नमूद केले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते पूर्णपणे भाजपसोबत असून, ते उत्तम काम करत आहेत. खडसे यांनी चोपडा शहरातही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास व्यक्त करत, आपले पॅनेल बहुमताने निवडून येईल आणि महिला नगराध्यक्ष विराजमान होतील अशी आशा व्यक्त केली. २ डिसेंबर रोजी कमळ आणि घड्याळ या चिन्हांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी चोपड्याच्या मतदारांना केले.

Published on: Nov 26, 2025 02:16 PM