रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर

रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर

| Updated on: Jul 30, 2025 | 4:40 PM

रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सदानंद कदम यांनी ही भेट व्यावसायिक आणि गणपती उत्सवाशी जोडली. मात्र, परब यांनी रामदास आणि योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ही भेट अधिकच महत्त्वाची ठरली आहे. या भेटीमागील खरे कारण अद्याप स्पष्ट नाहीये.

रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांनी अनिल परब यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सदानंद कदम यांना या भेटीचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, “ही भेट व्यावसायिक कारणांसाठी आणि गणपतीच्या निमित्ताने झाली. आम्ही व्यावसायिक कारणांसाठी महिन्यातून एकदा परब यांना भेटतो.” या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अनिल परब यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, मुंबईतील सावली रेस्टॉरंट अँड बार हा प्रत्यक्षात डान्स बार आहे, जिथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी छापा टाकून काही मुलींना ताब्यात घेतले होते. तसेच, वाळू प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही परब यांनी योगेश कदम यांच्यावर केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देत रामदास आणि योगेश कदम यांनी परब यांचे सर्व दावे फेटाळून लावले आणि त्यांना सडेतोड उत्तर दिले.

Published on: Jul 30, 2025 04:40 PM