ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, माजी नगरसेवकाच्या फोटोला फसलं काळं

ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, माजी नगरसेवकाच्या फोटोला फसलं काळं

| Updated on: Aug 03, 2025 | 2:17 PM

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या फोटोला काळं फसण्यात आलं आहे. रामदास कांबळे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांबळे यांनी आज ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वी त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत त्यांच्या बॅनर आणि फोटोवर काळे फासले आहे.

रामदास कांबळे हे प्रतीक्षानगरचे माजी शिवसेना नगरसेवक होते. त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच प्रतीक्षानगर परिसरात त्यांच्या फोटो आणि बॅनरवर काळे फासण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व बॅनरवर काळं फसलं जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Published on: Aug 03, 2025 02:17 PM