Rane Brothers : सिंधुदुर्गात राणे बंधूंमध्ये भडकलं ‘वॉर’, निवडणूक पैशांच्या आरोपांवर निलेश अन् नितेश राणे आमने-सामने

| Updated on: Nov 28, 2025 | 12:34 PM

सिंधुदुर्गमध्ये राणे बंधूंमधील राजकीय वॉर तीव्र झाला आहे. निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरातून निवडणूक आयोगाने २५ लाख रुपये जप्त केल्याचा दावा केला, तर नितेश राणेंनी हे व्यवसायाचे पैसे असल्याचे सांगत निवडणूक आयोगाकडे सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्यांनी निलेश राणेंवर अनधिकृत प्रवेशाचाही आरोप केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधूंमध्ये राजकीय संघर्ष पेटला आहे. निलेश राणेंनी मालवणमधील भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकून निवडणूक आयोगाने २५ लाख रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे. मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतांसाठी पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप त्यांनी केला, यासाठी रवींद्र चव्हाण यांना जबाबदार धरले. यावर नितेश राणेंनी केनवडेकर यांच्या घरी भेट देऊन ती रक्कम त्यांच्या व्यवसायाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, केनवडेकर हे पैसे व्यवसायाशी संबंधित आहेत हे निवडणूक आयोगासमोर सिद्ध करतील. नितेश राणेंनी निलेश राणेंवर अनधिकृतपणे घरात प्रवेश केल्याचा आणि बेडरूममध्येही गेल्याचा आरोप केला. दोन्ही भावांच्या आरोपांमुळे या प्रकरणाची निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी होत आहे.

Published on: Nov 28, 2025 12:34 PM