माझं मंत्रिपद जाणार म्हणून काही जणांना गुदगुल्या झाल्या तर काही खुशीत होते : रावसाहेब दानवे

| Updated on: Aug 20, 2021 | 9:38 AM

केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांची मांडव परतनी झाली हनिमून बी होऊन जाईल, अशी टोलेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली. मात्र, भागवत कराड हे पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्यानं मांडव परतनी हा शब्द वापरल्याचं दानवे म्हणाले. माझे मंत्रीपद जाणार म्हणून काही जणांना आनंद तर काही जणांना गुदगुल्या झाल्या होत्या, असा टोलाही दानवे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.

Follow us on

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालन्यातील सत्कार समारंभाला हजेरी लावली. 35 वर्ष मला जालना जिल्ह्यातील मतदारांनी खासदार केले म्हणून आज केंद्रीय रेल्वे मंत्री झालो, आणि हे झाले नसतो तर जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले. इतकंच नाही तर मतदाराच्या हातात आमच्या पतंगाचा दोरा आहे, असंही ते म्हणाले. केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांची मांडव परतनी झाली हनिमून बी होऊन जाईल, अशी टोलेबाजी रावसाहेब दानवे यांनी केली. मात्र, भागवत कराड हे पहिल्या वेळेस मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्यानं मांडव परतनी हा शब्द वापरल्याचं दानवे म्हणाले. माझे मंत्रीपद जाणार म्हणून काही जणांना आनंद तर काही जणांना गुदगुल्या झाल्या होत्या, असा टोलाही दानवे यांनी आपल्या विरोधकांना लगावला.