Pune Protest : पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवर चढले

Pune Protest : पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवर चढले

| Updated on: Mar 09, 2025 | 3:41 PM

पुण्यात महिलांवरील वाढत्या atyacharachya

पुण्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुणे मेट्रो स्थानकात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलक मेट्रो ट्रॅकवर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ट्रॅकवरून हटवलं. बेरोजगारी आणि पुण्यातील महिलांवर वाढलेल्या अत्याचाराच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेत पुणे मेट्रो स्थानकात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी आंदोलक मेट्रोच्या ट्रॅकवर उतरून आंदोलन करत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Published on: Mar 09, 2025 03:41 PM