रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात आज माघी यात्रा, भाविकांची गर्दी

रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात आज माघी यात्रा, भाविकांची गर्दी

| Edited By: | Updated on: Jan 25, 2023 | 12:12 PM

आज गणेश जयंती आहे. त्यामुळे कोकणात उत्साहाचं वातावरण आहे. पाहा व्हीडिओ...

रत्नागिरी : आज गणेश जयंती आहे. त्यामुळे कोकणात उत्साहाचं वातावरण आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात आज माघीची यात्रा आहे. माघी गणेशोत्सवाची कोकणात धूम पाहायला मिळतेय. पहाटे चार वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं आहे. श्रींच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गणपतीपुळे मंदीर परिसरात आले आहेत. आज संध्याकाळी माघी गणेशोत्सव निमित्त श्रींची पालखी निघणार आहे. माघी उत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिरात पुढील तीन दिवस कार्यक्रम चालणार आहेत.

Published on: Jan 25, 2023 12:12 PM