Ravi Rana यांनी नागपूर पोलिसांचे मानले आभार

Ravi Rana यांनी नागपूर पोलिसांचे मानले आभार

| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 4:31 PM

महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला त्यांनी देवाला केली, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी नागपूर पोलिंसांचे आभार मानले आहेत. 

उद्धव ठाकरेंचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे. याठिकाणी शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगारी वाढली आहे. भारनियमन आहे. मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात पाय ठेवला नाही. मंत्रालयात पाय ठेवला नाही. अशा परिस्थितीत राज्याची जनता मुख्यमंत्र्यांकडून त्रस्त आहे. यासाठी आम्ही शनी मंदिरात जाऊन प्रार्थना करणार आहोत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं विघ्न आहे. हे दूर झालं पाहिजे. महाराष्ट्रात शांती, सुव्यवस्था नांदली पाहिजे, अशी प्रार्थना देवाला त्यांनी देवाला केली, अशी माहिती रवी राणा यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी नागपूर पोलिंसांचे आभार मानले आहेत.

Published on: May 28, 2022 04:30 PM