Hinganghat Case | रुग्णालयात जाताना अंकिता काय सांगत होती?, सांगतायत पोलीस नायक Pratibha Dudhbale

Hinganghat Case | रुग्णालयात जाताना अंकिता काय सांगत होती?, सांगतायत पोलीस नायक Pratibha Dudhbale

| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 7:22 PM

ज्यावेळेस ही घटना झाली, त्यानंतर अंकीता पिसूड्डे यांना घेऊन पोलीस कर्मचारी प्रतिभा दुधबळे नागपूरच्या ॲारेंज सिटी रुग्णालयात घेऊन गेल्या. पुढचे सात दिवस प्रतिभा दुधबळे त्यांच्यासोबत होत्या.

नागपूर : 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळच्या सुमारास प्रा अंकीता पिसूड्डे यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात घडलेल्या या घटनेचे तेव्हा राज्यभर पडसाद उमटले होते. या जळीत कांडातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्यावर आज खुनाचे आरोप सिद्ध झालेत. ज्यावेळेस ही घटना झाली, त्यानंतर अंकीता पिसूड्डे यांना घेऊन पोलीस कर्मचारी प्रतिभा दुधबळे नागपूरच्या ॲारेंज सिटी रुग्णालयात घेऊन गेल्या. पुढचे सात दिवस प्रतिभा दुधबळे त्यांच्यासोबत होत्या.