Special Report | अब्दुल सत्तारांविना सत्तेचा विस्तार?

| Updated on: Aug 08, 2022 | 10:08 PM

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्रीच त्यांना करतील अशी खोचक टोलाही त्यांना लगावला आहे. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तारांना मंत्रिप मिळणार नसल्याचीच दाट शंका आहे. 

Follow us on

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर आला असतानाच आणि मंत्रिपदाची अपेक्षा ठेऊन बंडखोरी केलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदावर गंडातर येण्याची शक्यता आहे. कारण उद्या मंत्रिमंडळ होत असतानाच टीईटी घोटाळा झालेल्या प्रकरणामध्ये अब्दुल सत्तार यांच्या चारही मुलांची नावं आली आहेत. त्यामुळे विरोधकांकडून हे प्रकरण लावून धरण्याची शक्यता आहे. एकीकडे अब्दुल सत्तार झालेल्या आरोपांवर स्पष्ट बोलत नाहीत तर दुसरीकडे मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्रीच त्यांना करतील अशी खोचक टोलाही त्यांना लगावला आहे. त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तारांना मंत्रिप मिळणार नसल्याचीच दाट शंका आहे.