Ratnagiri | रेवा कासवाचा तब्बल 650 किमीचा सागरी प्रवास
सर्वाधिक अंतर कापणारी कासव रेवा ठरलीय. तर प्रथमाने 550 किलोमीटरचे अंतर पार केलेय. सावनीने नवी मुंबईपर्यंतचा प्रवास केलाय तर वनश्री ही दक्षिणेकडील समुद्रात घुटमळताना दिसतेय. आता ती सिंधुदूर्गपासून 100 किलोमीटर अंतरावर दिसून येतेय.
रत्नागिरी : पश्चिम किनारपट्टीवर पहिल्यांदाच सुरु असलेल्या आँलिव्ह रिडले कासावांच्या सँटलाईट प्रयोगातून नवनवीन माहिती समोर येतेय. रेवा या कासवाने 650 किलोमीटरचा प्रवास केलाय हे कासव सरळमार्गी दक्षिणेकडील समुद्रात जाताना दिसतेय. सर्वाधिक अंतर कापणारी कासव रेवा ठरलीय. तर प्रथमाने 550 किलोमीटरचे अंतर पार केलेय. सावनीने नवी मुंबईपर्यंतचा प्रवास केलाय तर वनश्री ही दक्षिणेकडील समुद्रात घुटमळताना दिसतेय. आता ती सिंधुदूर्गपासून 100 किलोमीटर अंतरावर दिसून येतेय. कोकण किनारपट्टीवर कासव ही अंडी घाण्यासाठी येतात मात्र त्यांचा अभ्यास करण्यासाठी चार कासवांवर सँटेलाईट टँगिंग करण्यात आलं होतं.
