Puratawn : माय-लेकीच्या गुंतागुंतीच्या नात्यावर ‘पुरातन’, रितुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या…

Puratawn : माय-लेकीच्या गुंतागुंतीच्या नात्यावर ‘पुरातन’, रितुपर्णा सेनगुप्ता म्हणाल्या…

| Updated on: Apr 19, 2025 | 11:09 AM

पुरातन या बंगाली सिनेमातून एका 80 वर्षीय व्यक्तीच्या जीवनातील भूतकाळ आणि वर्तमान काळातील आठवणींच्यामधील संबंधांचं दर्शन घडतं. बघा अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता काय म्हणाल्यात?

अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता आणि शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ या चित्रपटाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच रितुपर्णाच्या नावावर आणखी एका कामगिरीची भर पडली आहे. रितुपर्णाला डीसी साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही मिळाला. पुरातन या चित्रपटाच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची या बंगाली चित्रपटातून दमदार एन्ट्री होत आहे. तब्बल 14 वर्षांनंतर त्यांनी या चित्रपटामध्ये आईची भूमिका साकारली तर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत रितुपर्णा सेनगुप्ता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पुरातन हा चित्रपट आई आणि मुलीच्या गुंतागुतीच्या नात्यावर भाष्य करतो.  हा चित्रपट सुमन घोष यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाविषयी बोलताना रितुपर्णा सेनगुप्ता भरभरून बोलल्याचे पाहायल मिळाले. ‘मी आज खूप आनंदी आहे,  हा चित्रपट आमच्यासठी खूप स्पेशल आहे. या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी तब्बल 14 वर्षानंतर चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. या चित्रपटाबद्दल विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये  शर्मिला टागोर यांची भूमिका आहे, आणि माझा मदर-डॉटर स्टोरीचा एक ब्युटीफूल अँगल आहे.’, असं त्या म्हणाल्यात.

 

 

Published on: Apr 19, 2025 11:09 AM