पतीसाठी पत्नीची वकिली! रोहिणी खडसे कोट घालून न्यायालयात

पतीसाठी पत्नीची वकिली! रोहिणी खडसे कोट घालून न्यायालयात

| Updated on: Jul 29, 2025 | 5:22 PM

पतीसाठी पत्नीची वकिलीचा कोट घालून कोर्टात हजर झाल्याचं चित्र आज न्यायालयात बघायला मिळालं आहे.

पतीसाठी पत्नीची वकिलीचा कोट घालून कोर्टात हजर झाल्याचं चित्र आज न्यायालयात बघायला मिळालं आहे. पुणे पार्टी खेवलकर प्रकरणात 2 मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. स्वत:च्या पतीच्या सुनावणीसाठी वकिली पोशाख घालून रोहिणी खडसे न्यायालयात उभ्या राहिल्या.

इशा सिंग नावाच्या महिलेचा वापर करुन कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. इशा सिंगकडे मादक द्रव्य सापडून तिला न्यायालयीन कोठडी आणि खेवलकरांना पोलीस कोठडी चुकीची असल्याचं वकील म्हणालेत. दुसरीकडे एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांची माझ्यावर पाळत का? मंगेश चव्हाणांकडे व्हिडीओ कसे आले? खासगी व्हिडीओ कुणी लिक केले? रेव्ह पार्टीची व्याखा काय आहे? असे प्रश्न देखील खडसे यांनी उपस्थित केलेले आहेत.  दरम्यान, खटल्याची सुनावणी संपल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे मी योग्य वेळी बोलेन, असं रोहिणी खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हंटलं आहे.

Published on: Jul 29, 2025 05:22 PM