Rupali Chakankar : ‘पुन्हा भिसे प्रकरण…’, दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील ‘त्या’ घटनेनंतर रूपाली चाकणरांची मोठी ग्वाही
उद्याच्या पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकरणासंदर्भात कारवाईची भूमिका निश्चितपणे मांडली जाईल, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक मोठी ग्वाही दिली आहे. पुन्हा भिसे प्रकरण घडू नये, याची काळजी आणि जबाबदारी आम्ही घेऊ, असं वक्तव्य रूपाली चाकणकर यांनी केलं आहे. तर घडलेल्या प्रकरणासंदर्भात दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही म्हणत रूपाली चाकणकर यांनी ग्वाही दिल्याचे पाहायला मिळत आहे. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात घडलेल्या प्रकरणानंतर पहिल्या दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. गेल्या दोन दिवसापूर्वी ११ तारखेला मंत्रालयात माता अन्वेषण मृत्यू समितीचा अहवाल सादर करण्यात आला. त्यापूर्वी ८ तारखेला धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयात सादर करण्यात आला आणि उद्या उच्च स्तरीय समिती यांचा ससून रूग्णालयातील अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर उद्याच पाच वाजता पत्रकार परिषद असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
