Rupali Thombre Patil : रूपाली ठोंबरे पाटलांनी NCP शहर कार्याध्यक्ष पद सोडलं, दोन दिवसांपर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी अन्….

Rupali Thombre Patil : रूपाली ठोंबरे पाटलांनी NCP शहर कार्याध्यक्ष पद सोडलं, दोन दिवसांपर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी अन्….

| Updated on: Dec 01, 2025 | 3:50 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, पक्षाकडून त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. मात्र, पक्षाकडून त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाहीये. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

गेल्या काही काळापासून रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती आणि त्या सातत्याने आपली नाराजी व्यक्त करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील असा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, त्यामुळेच रुपाली पाटील यांनी हे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे.

राजीनामा देण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळी त्यांनी आक्रमकपणे पक्षाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख टाळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Dec 01, 2025 03:49 PM