लसींचा तुटवडा संपणार, रशियाची स्पुतनिक वी लसीची पहिली खेप भारतात दाखल

| Updated on: May 01, 2021 | 5:52 PM

लसींचा तुटवडा संपणार, रशियाची स्पुतनिक वी लसीची पहिली खेप भारतात दाखल

Follow us on

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना भारताला करावा लागत आहे. देशभरात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, व्हेंटिलेटर्सच्या तुटवड्याला भारताला सामोरं जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं काही दिवसांपूर्वी रशियाच्या स्पुतनिक वी (Sputnik V ) या लसीलामंजुरी दिली आहे. स्पुतनिक वी लसीची पहिली खेप भारताला दाखल झाली आहे.