Saamna Editorial : मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार; सामनातून फडणवीस सरकारवर ताशेरे
Mahayuti Government Clashes : ठाकरे गट शिवसेनेचं मुखपृष्ठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामनामधून आज राज्यातल्या फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे.
फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा सुरू असं सामनामध्ये म्हंटलं आहे. मंत्रिमंडळातील मिंधे मंडळ हे अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचा दावा देखील सामनामधून करण्यात आला आहे. तसंच मिंध्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याची टीका देखील अग्रलेखातून करण्यात आली आहे. शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. तर दादांनी नाड्या आवळून धरल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला आहे, असंही यात म्हंटलं आहे.
‘तीन पक्षांचा तमाशा’ या मथळ्या खाली आज सामनातून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात म्हंटलं आहे की, मिंधे मंडळ ठाकरे सरकारमध्ये देखील नाराज होते आणि आता फडणवीस सरकारमध्येही त्यांची नाराजी कायम आहे. फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा सुरू आहे. त्यावरून भविष्यात मंत्रिमंडळातच टोळी युद्ध भडकू नये म्हणजे झालं! अशी टीका या लेखातून करण्यात आली आहे.
