Salman Khan : बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची पुन्हा मिळाली धमकी

Salman Khan : बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची पुन्हा मिळाली धमकी

| Updated on: Apr 14, 2025 | 1:08 PM

Salman Khan Car Threat : अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्या मिळत आहे. याआधी देखील त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी वरळी पोलिसांना मिळाली आहे.

अभिनेता सलमान खान याची गाडी उडवून देण्याची धमकी आलेली आहे. पुन्हा एकदा बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देण्याची धमकी पोलिसांना आलेली आहे. वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्स अॅपवर हा धमकीचा मेसेज आलेला आहे. त्यावरून वरळी पोलिसात धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्यांचे फोन मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या घराबाहेर हल्ला देखील झाला होता. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आलेली होती. असं असतानाच आता पुन्हा एकदा सलमान खान याची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी वरळी वाहतूक पोलिसांना मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Published on: Apr 14, 2025 01:08 PM