Saamana | खेलरत्नचं नामकरण म्हणजे राजकीय खेळ, ‘सामना’तून केंद्र सरकारवर निशाणा

Saamana | खेलरत्नचं नामकरण म्हणजे राजकीय खेळ, ‘सामना’तून केंद्र सरकारवर निशाणा

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 10:07 AM

या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत, असं म्हणत राऊतांना केंद्र सरकारविरोधात टीकेची तोफ डागली आहे. मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल, असा महत्त्वाचा मुद्दा राऊतांनी सामनातून अधोरेकित केला आहे.

पंतप्रधान मोदी-दिवंगत जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय… त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असं नामकरण केलं गेलं. केंद्र सरकारने हा राजकीय खेळ केला. या राजकीय खेळाने अनेकांची मने दुखावली आहेत, असं म्हणत राऊतांना केंद्र सरकारविरोधात टीकेची तोफ डागली आहे. मोदी सरकारचे म्हणणे आहे की, ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार देणे ही लोकभावना आहे. पण राज्य हे सूडाने, द्वेषाने चालवता येत नाही हीसुद्धा एक लोकभावना आहे व त्या भावनेची दखल घ्यावीच लागेल, असा महत्त्वाचा मुद्दा राऊतांनी सामनातून अधोरेकित केला आहे. लोकभावना वगैरे बोलायला ठीक आहे, पण सध्या राज्यकर्ते ठरवतात तीच लोकभावना व त्या लोकभावनेवर भजनाचे टाळ वाजवणे हेच सुरु आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केलीय.