Abu Azmi : पंढरीच्या वारीवरून अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक….

Abu Azmi : पंढरीच्या वारीवरून अबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक….

| Updated on: Jun 22, 2025 | 6:50 PM

वारीमुळे रस्ता जाम होतो, पण मुस्लीम समाज तक्रार करत नाही. पण मुसलमानांनी नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते, असं आबू आझमी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होतेय

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. मशिदीबाहेर नमाज पठण करु शकत नाही. आम्ही कुणाची तक्रार करत नाही आहोत. आम्ही आमच्या हिंदू बांधवाच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कधीही कुठल्या मुसलमानाने ही तक्रार केली नाही की, रस्त्यावर उत्सव का साजरी केला जातो? पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु, अशी धमकी दिली जात असल्याचे अबू आझमी म्हणाले.

पुढे ते असेही म्हणाले, मी पुण्याहून येत होतो. तेव्हा मला लोकांनी सांगितलं की, पालखी जाणार आहे. त्यामुळे लवकर जा. नाहीतर रस्ता जाम होईल. रस्ता जाम होत आहे. पण आम्ही कधी विरोध केला नाही. आमच्या नमाज पठणाच्या वेळी जाणीवपूर्वक या देशात मुसलमानांसाठी जमीन कमी केली जात आहे, असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jun 22, 2025 06:50 PM