MNS : उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात अन्… संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

MNS : उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात अन्… संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 06, 2025 | 3:25 PM

राज ठाकरेंसोबत युती कधी करणार या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरेंनी जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल असं एकाच वाक्यात उत्तर दिलं. यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले ठाकरेंच्या मनात काय हे महत्त्वाचं आहे.

मनसेचे अंधेरी पूर्वचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेनुसार शुक्रवारी वैभव दळवी यांनी त्यांच्या समर्थकांसह हाती शिवबंधन बांधल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि इतर प्रमुख नेते हजर होते. यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना सवाल केला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘उद्धव ठाकरे यांना त्यांचे पदाधिकारी फसवतात. मनसेचा पदाधिकारी फोडून त्याला आपल्या पक्षात आणलाय. त्यांना बरं वाटतं. पण त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून क्रॉस चेक करावं कारण तो आमचा पदाधिकारी नाही. २०१४ ला तो मनसेचा पदाधिकारी होता. नंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. २०१४ ते २०२५ तो मनसेच्या बॅनरवर नाही. तो आमचा कार्यकर्ता नेता नाही’, असं संदीप देशपांडे म्हणाले.

Published on: Jun 06, 2025 03:24 PM