Sandipan Bhumre : राऊतांना घेऊन आम्हाला आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? संदीपान भूमरेंचा खोचक टोला

Sandipan Bhumre : राऊतांना घेऊन आम्हाला आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? संदीपान भूमरेंचा खोचक टोला

| Updated on: Apr 14, 2025 | 11:38 AM

Sandipan Bhumre On Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संदीपान भूमरे यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेना उबठा गटावर तसंच संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांना आमच्या पक्षात घेऊन आमचं वाटोळं करायचं आहे का? अशी खोचक टीका करत ठाकरेंच्या गटात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एवढेच लोक राहतील असं मंत्री संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकात खैरे आणि अंबादास दानवेच राहतील असंही यावेळी बोलताना भूमरे यांनी म्हंटलं आहे.

यावेळी बोलताना मंत्री भूमरे म्हणाले की, शिवसेना उबठा गटात महाराष्ट्र पातळीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोनच नेते उरतील. संभाजीनगरमध्ये त्यांच्या गटाचे चंद्रकात खैरे आणि अंबादास दानवे हे दोनच नेते उरतील, असं त्यांनी म्हणताच पत्रकारांनी संजय राऊत तुमच्याकडे येतील का? असं विचारल्यावर आम्हाला संजय राऊतची गरज नाही. आम्हाला कोणाचीच गरज नाही. आम्हाला आमचे भरपूर आहेत. आम्ही संजय राऊत यांना आमच्या पक्षात घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? जस त्यांच्या पक्षाचं झालं तसंच? असंही यावेळी खोचकपणे भूमरे यांनी म्हटलं.

Published on: Apr 14, 2025 11:38 AM