जिथं सिंहाचा ‘छावा’ कैद झाला, त्या वाड्याचं वास्तव काय? इतिहासानं अन्याय केला पण वर्तमान राजेंना न्याय देईल?
संभाजीराजेंच्या जिते कैद झाले त्या संगमेश्वरच्या वाड्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यामागचं वास्तव काय? इतिहासानं संभाजीराजांच्या कर्तृत्वावर अन्याय केलाय. मात्र वर्तमान संभाजीराजांच्या शौर्याच्या साक्षीदार ठरलेल्या वास्तूंना न्याय देईल का?
स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या संभाजीराजेंच्या मृत्यू प्रसंगावेळी सिनेमागृहात अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. इतिहासात दुर्लक्षित राहिलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांची ज्या प्रकारे हत्या झाली ते पाहून काळीज हादरतं. दुसरीकडे ज्या संगमेश्वरमधून संभाजीराजेंना मोगलांनी कैदेत घेतलं तो संगमेश्वरमधला वाडा ही सोशल मीडियात चर्चेत आलाय. संगमेश्वरमधल्या या सरदेसाई वाड्याचे दृश्य व्हायरल होत आहेत. याच वाड्यामधून संभाजीराजेंना कैद झाल्याचं सांगितलं जातेय. मात्र इतिहासकारांच्या माहितीनुसार, हा वाडा नंतरच्या काळात बांधला गेला. याच परिसरातून संभाजीराजेंना अटक झाली खरी पण या वाड्याऐवजी तिथे संभाजीराजेंचा मोठा महाल होता. मोगलांच्या कैदेत सापडण्याआधी संभाजी महाराज 400 ते 500 मावळ्यांसोबत इथल्या वाड्यात आले होते. औरंगजेबाच्या बंदोबस्तासाठी वाड्यात खलबतही झाली. मात्र स्वराज्यातल्याच काहींनी फितुरी करून संभाजीराजांच्या ठिकाणाची माहिती औरंगजेबापर्यंत पोहोचवली आणि जवळपास तीन ते चार हजार मोगल घेऊन औरंगजेबाकडच्या मुकर्रब खानने संगमेश्वर वाड्याला वेढा दिला.
एकीकडे संभाजीराजंसोबत 400 ते 500 मावळे होते आणि दुसरीकडे तीन ते चार हजाराचं मोगली सैन्य. तरीही अनेक तास मावळ्यांनी कडवी झुंज दिली. इतकं मोठं मोगली सैन्य असूनही संभाजीराजेंना हातापायात साखळदंड घालून कैदेत नेलं गेलं. औरंगजेब महाराष्ट्रात येताना साडेचार लाखाच्या सैन्याने पोहोचला होता. मात्र तीन लाख सैन्य प्रत्यक्ष लढाया करणार होतं आणि दुसरीकडे स्वराज्यातल्या मावळ्यांची संख्या लाख, सव्वा लाखापर्यंत होती. पण तरीही संभाजीराजेंनी एक दोन नाही तर तब्बल नऊ वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
