मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटपानंतरही शिवसेनेचा राष्ट्रवादीला विरोध कायम, रायगडनंतर बुलढाण्यात पडली ठिणगी!

मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटपानंतरही शिवसेनेचा राष्ट्रवादीला विरोध कायम, रायगडनंतर बुलढाण्यात पडली ठिणगी!

| Updated on: Jul 16, 2023 | 10:07 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता सत्तेत सामील झाल्यानंतर लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली आहे. तसेच पालकमंत्र्यांची देखील घोषणा होणार आहे. यावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता सत्तेत सामील झाल्यानंतर लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांना चांगली खाती मिळाली आहे. तसेच पालकमंत्र्यांची देखील घोषणा होणार आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांना विरोध केला तसाच प्रकार आता बुलढाण्यात होताना दिसत आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पालकमंत्री पदावरून मोठं वक्तव्य केलं आहे. बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या मंत्र्याला मिळालं तर? असा प्रश्न संजय गायकवाड यांना पत्रकारांनी विचारला त्यावर त्यांनी “बुलढाणा जिल्ह्यात 2 शिवसेना आणि 3 भाजपचे आमदार आहेत. इथे आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला काही झालं तरी पालकमंत्री पद मिळू देणार नाही,” असं गायकवाड म्हणाले.

Published on: Jul 16, 2023 10:07 AM