‘सरकारी रूग्णालयांना स्मशानकळा अन्…’, सामनातून शिंदे सरकारवर हल्लाबोल
VIDEO | 'कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पडली आहेत. पण आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कोठे आहेत? ते दिल्लीत काय करीत आहेत?', सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत काय केला सवाल?
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | सरकारी रूग्णालयांना स्मशानकळा आणि मुख्यमंत्री कोठे आहेत? असा थेट सवाल सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारला विचारण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये काय करत आहे? असा खोचक सवालही सामनातून करण्यात आला असून नांदेडमधील घटनेवरून राज्य सरकारवर हा निशाणा साधण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला बेहाल आहेत. सरकारी रुग्णालयांना स्मशानकळा आली आहे. रोज कुठे ना कुठे मृत्यूची छापेमारी सुरूच आहे. या सर्व तणावाच्या स्थितीत ना मुख्यमंत्री जागेवर आहेत ना दोन उपमुख्यमंत्री. लंडनवरून वाघनखे येतील, पण दिल्लीने महाराष्ट्राची नखे कापून वाघाच्या आयाळीस हात घातला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाब विचारायचे सोडून ते दिल्लीत जर्जर झालेल्या सर्कशीतल्या वाघाच्या भूमिकेत शिरून बसले आहेत.’,असे सामनातून म्हटले आहे.
तर कोविड काळात गंगेत प्रेते तरंगत होती तशी प्रेते आता महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांत पडली आहेत, पण आपले स्वाभिमानी की काय ते मुख्यमंत्री कोठे आहेत? ते दिल्लीत काय करीत आहेत? असा सवालही मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलाय.
