Sanjay Raut Video : ‘नीलम गोऱ्हे निर्लज्ज, विकृत बाई… पक्षातून ४ वेळा आमदार पण जाताना घाण…’, राऊत भडकले अन् घेतला समाचार

Sanjay Raut Video : ‘नीलम गोऱ्हे निर्लज्ज, विकृत बाई… पक्षातून ४ वेळा आमदार पण जाताना घाण…’, राऊत भडकले अन् घेतला समाचार

| Updated on: Feb 24, 2025 | 1:57 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केलाय. नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचे वक्तव्य करत संजय राऊत यांनी चांगलाच घणाघात केला.

अखिल भारतीय साहित्य संमेलनातून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एक पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर ठाकरे गटांकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर एकच संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी पुन्हा नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केलाय. नीलम गोऱ्हे निर्लज्ज आणि विकृत बाई असल्याचे वक्तव्य करत संजय राऊत यांनी चांगलाच घणाघात केला. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून राऊतांनी चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. ‘नीलम गोऱ्हे चार वेळा पक्षातर्फे आमदार झाल्यात मात्र जाताना घाण करून गेल्या’, असं म्हणत राऊतांनी जिव्हारी लागणारी टीका नीलम गोऱ्हेंवर केली. इतकंच नाहीतर साहित्य संमेलनात झालेल्या चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार असल्याचे संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी आरोप करताना असेही म्हटले की, नीलम गोऱ्हे यांनी काल पत्रकारांना सांगितले की, मी महामंडळाला ५० लाख दिले. त्यानंतर माझा कार्यक्रम लावला. ते लोकांनी रेकॉर्ड केले आहे. त्या लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे घेतात? प्रश्न विचारण्यासाठी किती पैसे घेतात? माझ्याकडे सर्व माहिती असल्याचा दावाही राऊतांनी केला.

Published on: Feb 24, 2025 01:56 PM