काँग्रेसच टार्गेट भाजप नाही तर केजरीवाल? ‘सामना’तून संजय राऊतांचे दावे अन् ‘इंडिया’त खळबळ
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवा नंतर संजय राऊत यांनी सामनातून मोठे दावे केले. आपच्या पराभवाचा खापर काँग्रेसवर फोडण्यात आलं. त्याला काँग्रेसन कसं उत्तर दिलंय?
काँग्रेसचं टार्गेट भाजप नाही तर अरविंद केजरीवाल होते. काँग्रेसला भाजपाला नाही तर आपला हरवायचं होतं. सामनामधून संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात हे प्रश्न आता चांगलेच चर्चिले जाऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाचा पराभव झाला. खुद्द अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना देखील पराभवाची चव चाखावी लागली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे आपल्या खासदारांसह दिल्लीमध्ये केजरीवालांना भेटले. या भेटीत केजरीवालांसह झालेल्या चर्चेवरून संजय राऊतांनी अनेक मोठे दावे केले. जे इंडिया आघाडीतील काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतायत. सामनामधून संजय राऊतांनी बरेच मोठाले दावे केल्याचे पाहायला मिळाले. सामनातील रोखठोक मध्ये संजय राऊत इतक्यावरच थांबले नाहीत. तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पराभवांना देखील काँग्रेसच जबाबदार होती. असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. महाराष्ट्र राज्य ईव्हीएम पेक्षा अहंकार आणि ‘फक्त आम्हीच’ या वृत्तीने गमावला. आता दिल्लीतही तेच घडलं. महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसने शेवटच्या मिनिटांपर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता. राजधानी दिल्लीत काँग्रेसला भाजपाला नाही तर केजरीवालांना हरवायचं होतं. अशी खंत स्वतः केजरीवालांनी व्यक्त केल्याचही राऊतांनी म्हटलं आहे.
