Sanjay Raut : अमित शाह खून प्रकरणात आरोपी; ‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
Narkatla Swarg Book : ‘नरकातला स्वर्ग’ या आपल्या पुस्तकातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत.
देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा गौप्यस्फोट शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या आपल्या पुस्तकातून केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मदत केली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. अमित शाह हे एका खून प्रकरणात आरोपी होते. तर गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आरोपी होते असा देखील खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यांमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईत पार पडणार आहे.
Published on: May 16, 2025 09:14 AM
