‘शरद पवारांचे पाच खासदार फोडा अन् केंद्रात मंत्रिपद घ्या’, राऊतांच्या दाव्यानं खळबळ, कोणी दिली कोणाला ऑफर?
केंद्रीय पदावरून संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांचे पाच खासदार फोडा आणि केंद्रात मंत्रिपद मिळवा, अशी ऑफर भाजपने प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर अजित पवार गटानेही पलटवार केला आहे. केंद्रीय पदावरून संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटाकडून कोणतीही ऑफर आली नसल्याचे खासदार अमर काळे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या दाव्याला दुजोरा देत विजय वडेट्टीवार यांनी देखील दिल्लीत हालचाली सुरू असल्याचे म्हणत भाजपवर टीका केली. तर शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या दाव्यानंतर ठाकरे गटावर निशाणा साधला. मात्र संजय राऊत यांच्या दाव्यात कितपत सत्यता आहे? खरंच भाजपने अजित पवार गटाला ऑफर दिली आहे का? हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
