Sanjay Raut : फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ‘त्या’ ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; टपल्या, टोमणे मारण्यात ते पटाईत अन्…

Sanjay Raut : फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ‘त्या’ ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; टपल्या, टोमणे मारण्यात ते पटाईत अन्…

| Updated on: Jul 17, 2025 | 11:02 AM

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निरोप देण्याचा समारंभ होता. दानवेंना शुभेच्छा देताना आता २०२९ पर्यंत उद्धव जी तुम्हाला कोणताही स्कोप नाही. हवं तर तुम्हीच आमच्याकडे या…असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना थेट ऑफरच दिली यावर राऊतांनी भाष्य केलंय.

देवेंद्र फडणवीस टपल्या, टिचक्या , टोमणे मारण्यात पटाईत आहेत. त्यानुसार त्यांनी ठाकरेंना टोमणा मारला असेल त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर भाष्य करत खोचकपणे पलटवार केलाय. पुढे राऊत असेही म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांची ऑफर अजिबात गांभीर्याने घेत नाही, फडणवीसांनी जे केलं त्याला ऑफर म्हणत नाही त्याला टपल्या, टिचक्या म्हणतात. टाळीची वाक्य असतात काही सिनेमात तसंच हे आहे, सध्या फडणवीस डुप्लीकेट राष्ट्रावादी आणि शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहेत, असंही राऊत म्हणाले.

शिवसेना हे नाव आणि चिन्ह यासदंर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना लढा देत आहे. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासोबत जे डुप्लीकेट लोकं बसले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार आधी करावा की डुप्लीकेट लोकं ठेवायची की असली लोकं सोबत ठेवायची, सध्या तरी त्यांचा कारभार डुप्लीकेट लोकांना घेऊन चाललेला आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Jul 17, 2025 11:02 AM