तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
मुंबईच्या 26/11 च्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेला तहव्वुर राणा याला काल भारतात आणण्यात आलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना आज भाष्य केलं.
राणाला भारतात आणलंय पण क्रेडिट का घेताय? देशाच्या सुरक्षेची काळजी असेल तर पुलवामाचे क्रेडिट घ्या, कुलभूषण जाधवांना परत आणा. मेहूल चोक्शी, निरव मोदीला घेऊन या, असं शिवसेना उबठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. मुंबईच्या 26/11 च्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार असलेला तहव्वुर राणा याला काल भारतात आणण्यात आलं आहे. त्यावरून आता श्रेयवाद सुरू झाला आहे. त्याच संदर्भात आज संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मुंबई हल्ल्यातील एका आरोपीला भारतात आणलं गेलं असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केलं पाहिजे. त्यासाठी भाजपने क्रेडिट घ्यायचं कारण काय? या आधीही कायदेशीर प्रक्रियेनेच अबू सालेमला भारतात आणलं गेलं. तसंच या तहव्वूर राणाचं आहे. आता त्याचं क्रेडिट घेऊन त्याचा फेस्टिवल करू नका. भाजपला जर राणाचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचंही क्रेडिट घेतलं पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावं असंही टोला संजय राऊत यांनी लगावला.
