VIDEO : Sanjay Raut | पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर देशभर भाजपचा पराभव करावा लागेल : संजय राऊत

VIDEO : Sanjay Raut | पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचं असेल तर देशभर भाजपचा पराभव करावा लागेल : संजय राऊत

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 3:30 PM

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100 रुपयाने वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती 100 रुपयाने वाढवल्या आणि पाच रुपये कमी केले. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. संपूर्ण देशात पोटनिवडणुकात हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल? की पूर्णपणे पराभूत करावे लागेल? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल का? असा संतप्त सवाल करतानाच 2024 नंतर हे दिवस येतील असं वाटतं, असं राऊत म्हणाले.