Sanjay Raut | इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे? संजय राऊतांचा पंतप्रधान मोदीेंना सवाल

Sanjay Raut | इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे? संजय राऊतांचा पंतप्रधान मोदीेंना सवाल

| Updated on: Mar 12, 2026 | 12:18 PM

इराण–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र भारताने याबाबत अद्याप ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

इराण–इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र भारताने याबाबत अद्याप ठोस प्रतिक्रिया दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले की, सध्या देशाचे पंतप्रधान केरळ आणि तामिळनाडू येथे निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. देशात गॅस, पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेल यांसारख्या महत्त्वाच्या वस्तूंविषयी चिंता निर्माण झाली आहे. तरीही या मुद्द्यांवर सरकारकडून कोणतेही ठोस वक्तव्य किंवा कारवाई झालेली दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. राऊत यांनी आरोप केला की, सरकारचे लक्ष सध्या निवडणुका जिंकण्यावर अधिक आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी पैशांचा वापर केला जात आहे. त्यामुळे देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच राऊत यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. एकेकाळी जागतिक पातळीवर भारताच्या भूमिकेला महत्त्व होते, मात्र आता ते कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या अलीकडील परदेश दौऱ्यांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. या सर्व मुद्द्यांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही राऊत यांनी केली.

Published on: Mar 12, 2026 12:18 PM
Follow Us