Sanjay Raut : येड्या गबाळ्या सारखं काहीही म्हणेल, त्याला.. ; राऊतांचा संदीप देशपांडेंवर पलटवार

Sanjay Raut : येड्या गबाळ्या सारखं काहीही म्हणेल, त्याला.. ; राऊतांचा संदीप देशपांडेंवर पलटवार

| Updated on: Jun 22, 2025 | 11:14 AM

Sanjay Raut Vs Sandeep Deshpande : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलेल्या टिकेला खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्या सारख, त्याला अर्थ नाही, अशा शब्दांत राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरुण राऊतांवर निशाणा साधत त्यांना ताटातला चमचा म्हंटलं होतं. युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील ताटातल्या चमच्याने ताटात राहावं असं देशपांडे यांनी म्हंटलं होतं.

Published on: Jun 22, 2025 11:13 AM