Sanjay Raut | जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशानंतर संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये

Sanjay Raut | जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशानंतर संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये

| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 11:19 AM

 जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेनेला आलेल्या अपयशानंतर शिवसेना नेते संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राऊत यांनीही पुण्यात तळ ठोकला आहे.

मुंबई : जिल्हा परिषद निवडणुकीतील शिवसेनेला आलेल्या अपयशानंतर शिवसेना नेते संजय राऊत अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राऊत यांनीही पुण्यात तळ ठोकला आहे. रात्रीच पुण्यात येऊन संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला.शिवसेना नेते संजय राऊत काल रात्री उशिरा पुण्यता आले. त्यांनी पुण्यात आल्यावर रात्री उशिराच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. संघटनात्मक बांधणी, वॉर्डांची स्थिती, राज ठाकरे आणि अमित ठाकरे पुण्यात सातत्याने येत असल्याने पुण्यातील बदलेली हवा, शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील गटबाजी आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं.