राम असेल हनुमान असेल, ही आमची श्रद्धास्थाने – संजय राऊत
प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे असल्याचे कोल्हापूर पोटनिवडणुकीतील (Kolhapur By Election) निकालाने दाखवून दिले आहे, असे फटाके शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये (Nashik) निवडणूक निकालाची घोषणा होण्यापूर्वीच फोडले
प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि हनुमानाची गदा आमच्याकडे असल्याचे कोल्हापूर पोटनिवडणुकीतील (Kolhapur By Election) निकालाने दाखवून दिले आहे, असे फटाके शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये (Nashik) निवडणूक निकालाची घोषणा होण्यापूर्वीच फोडले. राऊतांनी शनिवाटी पंचवटी येथील सप्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आरती केली. यावेळी शिवसैनिकांनी जय श्रीरामची जोरदार घोषणाबाजी केली. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी 12 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. जवळपास 61.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. येथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्यासह 15 उमेदवार नशीब आजमावत आहेत.
Published on: Apr 16, 2022 12:20 PM
