चांद्यापासून बांद्यापर्यंत.. काय उखाडायचं ते..; राऊतांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

चांद्यापासून बांद्यापर्यंत.. काय उखाडायचं ते..; राऊतांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

| Updated on: Aug 03, 2025 | 12:29 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, “मराठी भाषेसाठी आम्ही प्रसंगी आक्रमक होऊ, मग तुम्ही काय करायचे ते करा. हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत मराठी माणसांचा आहे. आमच्या 106 हुतात्म्यांनी या भूमीसाठी बलिदान दिले, तुम्ही नाही. तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून शांत आहात, पण ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, त्या दिवशी तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी कराल.”

राऊत पुढे म्हणाले, “मराठी भाषेचा आग्रह धरण्यासाठी आम्ही आवश्यकता भासल्यास हिंसक मार्गही अवलंबू. तुम्ही मुरारजी देसाई बनण्याचा प्रयत्न करत आहात का? मराठीचा आग्रह धरल्यामुळे आमच्यावर गोळ्या झाडणार आहात का? होय, आम्ही मराठीचा आग्रह धरतो आहोत. आम्ही गुजरातला जाऊन मराठीची सक्ती करत नाही. आधी तुमच्या गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करा, मग महाराष्ट्रावर ती लादण्याचा प्रयत्न करा.”

Published on: Aug 03, 2025 12:29 PM