राहुल गांधी यांना सुप्रीम दिलासा! संजय राऊत यांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल; म्हणाले, “NDA मध्ये फूट…”

| Updated on: Aug 04, 2023 | 4:08 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी खासदारकी लढविण्याचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

मुंबई, 4 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी खासदारकी लढविण्याचा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात तरी न्याय जिवंत आहे. काही न्यायमूर्ती ज्यांना आम्ही रामशास्त्री म्हणतो, तो बाणा आजही त्या न्यायमूर्तींमध्ये आहे. मला कळतच नाही की, कोणत्या कारणासाठी राहुल गांधींना शिक्षा ठोठावली?. पण, मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. भाषणाच्या ओघात राहुल गांधी कर्नाटकात असं म्हणाले की, त्यांना आश्चर्य वाटतं की, सगळ्या चोरांची नावं मोदी कशी? एखादा कोणी मोदी असेल तो त्यावर मानहाणींचा दावा करू शकतो. पण राहुल गांधींची खासदारकी रद्द केली जाते.राहुला गांधींना संसदेच्या बाहेर काढण्यासाठी हे सगळं ठरवून झालं. ज्या पद्धतीचा निकाल दिलाय कोर्टाने. ते निकालपत्र पाहता. सोमवारी राहुल गांधींना परत घेण्यासंदर्भात ती जी कायदेशीर कारवाई असते संसदेत सुरू होईल आणि ते येतील. मी स्वत: राहुल गांधी यांना मागील अनेक वर्षांपासून जवळून पाहतो आहे. त्यांना कोणत्याही पदाची आशा नाही.तसंच हाव आणि भूक दिसत नाही. त्यांना या देशात परिवर्तन करायचं आहे. त्यांना देशातील हुकूमशाही सरकार उलथवून टाकायचं आहे. 2024 साली आम्ही सगळे त्या पद्धतीने कामाला लागलो आहोत. 2024 साली मोदी किंवा शाह हे सत्तेच्या आसपास देखील नसतील”