Sanjay Raut : अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीका

Sanjay Raut : अमेरिका के पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीका

| Updated on: May 11, 2025 | 10:43 AM

Sanjay Raut On India-Pakistan War Ceasefire : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धबंदीवर खासदार संजय राऊत यांनी सडेतोड टीका केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुचनेवरूनच भारताने युद्धबंदी स्वीकारली आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असल्याचं सांगण्यात येत आहे असं म्हणण चुकीचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? माणसं आमची मेली आहेत, असा खोचक प्रश्न उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर थांबवण्यात आलं आहे. याबद्दलची माहिती खुद्द ट्रम्प यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे. त्यानंतर यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी ट्रम्प आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प कोणत्या अधिकाराने ही मध्यस्थी करत आहेत? असंही यावेळी राऊतांनी विचारलं.

पुढे राऊत म्हणाले की, भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे. 140 कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. कोणत्या आधारावर? कोणत्या अटीशर्थीवर? काय मिळालं भारताला? युक्रेन आणि रशियाच्या युद्धात भाजपने जाहिरात केली, ‘पापाने वॉर रुकवा दिया..’, म्हणजे मोदींनी युद्ध थांबवलं. मग आता ‘अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?’ असा विखारी टोमणा देखील यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे.

Published on: May 11, 2025 10:39 AM