Sanjay Raut : …म्हणून सरकारची माघार; मेळावा एकत्र होणार, मी राज ठाकरेंशी बोललो, राऊतांचा दावा काय?
'हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणे हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मिळालेल्या विजयाची पहिली पायरी आहे. त्यानंतर पुढे असे अनेक विजय मिळवायचे आहे.', संजय राऊत बघा नेमकं काय म्हणाले?
विजय मेळावा एकत्र होईल मी राज ठाकरेंशी बोललो त्यांच्याशी चर्चा केली असं संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, हिंदी धोरणाचा जीआर रद्द झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सरकारनं हा जीआर मागे घेण्याचं कारणही सांगितलं. संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी व्यक्तींची ताकद दिसली. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात मराठी ताकदीचा भूकंप होणार होता. हे लक्षात येताच राज्यात हिंदी सक्तीचा अध्यादेश राज्य सरकारने मागे घेतला, असा दावा संजय राऊतांनी केला. तर ५ जुलै रोजी मोर्चाऐवजी विजयी सभा होणार आहे. ठाकरे बंधू या दोन प्रमुख नेत्यांशिवाय जे जे घटक या मोर्चात सहभागी होणार होते त्या सगळ्यांसह हा विजयी मेळावा होणार आहे. कारण ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची एकजूट असणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
