शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी सरकारला घेरलं! हत्येवेळीच सीसीटीव्ही बंद कसे? संजय राऊत यांचा सवाल

शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी सरकारला घेरलं! हत्येवेळीच सीसीटीव्ही बंद कसे? संजय राऊत यांचा सवाल

Harshada Shinkar | Updated on: Feb 17, 2023 | 1:11 PM

VIDEO | शशिकांत वारिसे यांच्या हत्येप्रकरणी संजय राऊत यांनी सरकारवर केली प्रश्नांची सरबत्ती, बघा काय म्हणाले संजय राऊत

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. दरम्यान, त्यापूर्वीच संजय राऊत यांनी वारिसे यांच्या कुटुंबियांना भेट दिली. वारिसे यांची हत्या झाली. मात्र हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने एसआयटी नेमली असली तरी याचा तपास निःपक्षपाती होईल का, अशी शंका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. वारिसे यांच्या खुनाची जागा जी पेट्रोलपंप आहे, तेथील आसपासचे ३-४ सीसीटीव्ही एकच वेळी बंद कसे? त्याचे कोणतेही फुटेज मिळत कसे नाही? असा सवाल विचारत संजय राऊत यांनी सरकारला चारही बाजून घेरले. या पेट्रोल पंपावर ८ कर्मचारी होते. त्यांनी याप्रकरणी कोणताही जबाब देऊ नये म्हणून त्याच्यावर दबाव आणला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणतात की प्लॅन करून खून केला. प्लॅन एकट्याचा होत नाही. मग त्यात कोण कोण आहेत, हा तपासाचा विषय असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 17, 2023 1:11 PM
Follow Us