Narayan Rane vs Sanjay Raut : संजय राऊत थोडक्यात वाचले, नारायण राणे असं का म्हणालेत? वाचा

| Updated on: Jun 12, 2022 | 12:04 PM

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

Follow us on

सिंधुदुर्ग: ‘राऊतही एका मताने आले. काठावर आले. वाचले आमच्या हातातून. आघाडीची मते त्यांना मिळायला हवी होती. ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी 145 मते लागतात. तुम्ही अल्पमतात आले आहात. तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या बाजूला व्हा, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंनी (narayan rane) केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमदेवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या या पराभवावर केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही. त्यांच्यावर आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी 145 मते लागतात. त्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आलं, असंही राणे यावेळी म्हणालेत.