Sanjay Raut : सचिन वाझे पुन्हा पोलिस सेवेत येऊ नये म्हणून मी..; संजय राऊतांचा मोठा खुलासा
Sanjay Raut PC : 'नरकातील स्वर्ग' या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सचिन वाझेप्रकरणावर भाष्य केलं आहे.
सचिन वाझे पुन्हा पोलिस सेवेत येऊ नये यासाठी मी स्वतः भेटलो होतो, असा मोठा खुलासा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हा खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सचिन वाझे पुन्हा पोलिस सेवेत येऊ नये म्हणून शरद पवारांना मी भेटलो होतो. मी पवारसाहेबांना स्पष्टपणे सांगितले होते की, वाझेला पुन्हा सेवेवर घेणे गडबडीचे ठरू शकते. मात्र तोपर्यंत निर्णय घेण्यात आला होता, तेव्हा तिथे अबू आजमी साक्षीला उपस्थित होते, असं ‘नरकातील स्वर्ग’ या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सांगितलं. यावेळी राऊतांनी भाजपा सरकारवर देखील टीका केलेली बघायला मिळाली.
Published on: May 18, 2025 12:36 PM
