Sanjay Raut Video : ‘शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..’, 2019 च्या मुख्यमंत्रिपदावरून राऊतांचा खळबळजक दावा

Sanjay Raut Video : ‘शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..’, 2019 च्या मुख्यमंत्रिपदावरून राऊतांचा खळबळजक दावा

| Updated on: Feb 19, 2025 | 4:25 PM

युतीमध्ये भाजपने शब्द पाळली नाही म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. तर महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत, अशी शरद पवारांची भूमिका होती, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना फुटली नसती, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांना 2019 साली मुख्यमंत्री करावं, ही उद्धव ठाकरेंची इच्छा होती असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. युतीमध्ये भाजपने शब्द पाळली नाही म्हणून शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. तर महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत, अशी शरद पवारांची भूमिका होती, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी केला. आजच्या पत्रकार परिषदेच यावर बोलताना राऊत म्हणाले, “त्या निर्णयात स्वत: एकनाथ शिंदे सहभागी होते. सामुदायिक निर्णय होता. त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांना कुठलं खातं मिळतं, हे त्यांच्यासाठी महत्त्वाच होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे ज्यूनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदासाठी विचार झाला नाही” असं संजय राऊत म्हणाले. तर “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करु नका, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं का?” असा सवाल माध्यमांनी राऊत यांना केला असता त्यावर राऊत ‘हो म्हणाले. यात लपवण्यासारखं काय आहे? भाजप बरोबर आम्ही सरकार बनवलं असतं, त्यांनी शब्द पाळला असता, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते’, असं राऊत म्हणाले.

Published on: Feb 19, 2025 04:24 PM