Sanjay Raut : ठाकरे ब्रँड आहे, तो कोणीही संपवू शकत नाही.., राऊतांचा दावा
Sanjay Raut News : ठाकरे ब्रॅंड महाराष्ट्रात आणि मुंबईत अजिंक्य आहे, त्यांना कोणीही संपवू शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील ठाकरे ब्रँड कोणी, कधीही संपवू शकत नाही. ठाकरे हा ब्रॅंड अजिंक्य आहे, असादावा संजय राऊत यांनी केला आहे. आज पत्रकारांशी बोलताना पालिका निवडणुकीच्या सर्वे विषयी भाष्य करताना त्यांनी हा दावा केला आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड आहे, तो मोदी, शहा किंवा दवेंद्र फडणवीस कोणीही संपवू शकत नाही. महाराष्ट्र मुंबईत हा ब्रँड अजिंक्य आणि अपराजित आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत जनतेची श्रद्धा, आदर आहे. मराठी माणूस, महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंबाने त्याग आणि संघर्ष केला आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र आणि मराठी माणूस घडवला, त्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Published on: Jun 15, 2025 12:50 PM
