Sanjay Raut : राऊतांनी राज ठाकरेंना पाठवलं पत्र; काय आहे मजकूर?

Sanjay Raut : राऊतांनी राज ठाकरेंना पाठवलं पत्र; काय आहे मजकूर?

| Updated on: May 29, 2025 | 3:09 PM

Sanjay Raut Send Letter To Raj Thackeray : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे या पत्रात नेमकं काय आहे? याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवलं आहे. या पुस्तकासोबत राऊत यांनी ठाकरेंना एक पत्र देखील पाठवलेलं आहे.

संजय राऊतांनी आपल्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भात ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिलेलं आहे. राऊत यांनी या पुस्तकातून केलेल्या गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. असं असतानाच आता हे पुस्तक संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पाठवलं आहे. तसंच सोबत एक पत्र देखील पाठवलेलं आहे. ‘मला 100 दिवस खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकल्याचं राऊतांनी या पत्रात म्हंटलं आहे. राज ठाकरेंना वाचनाची आवड असल्याने त्यांना हे पुस्तक पाठवलं असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मी पुस्तक पाठवलं आहे. माणसाने संकट काळात पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणून शिंदेंना हे पुस्तक पाठवलेलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मी हे बालसाहित्य पाठवलेलं असल्याचं यावेळी बोलताना राऊत यांनी सांगितलं आहे.

Published on: May 29, 2025 03:09 PM