Sanjay Raut : शिंदेंचा पक्ष मोदींची उपकंपनी, ते स्वतःलाच बाळासाहेब… युतीवरही मोठं वक्तव्य करत राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थावरील भाषणातून राजकीय युतीबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, ईडी, सीबीआयच्या दबावाखाली पक्षांतर करणाऱ्यांवर आणि दिल्लीच्या राजकारणावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील भाषणाकडे सर्वांनी लक्ष द्यावे, कारण याच भाषणातून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं. एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख टाळत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा अभाव असलेल्यांवर टीका केली. राऊत म्हणाले, जे ईडी आणि सीबीआयच्या दबावामुळे पक्षांतर करून ते सध्याच्या राजकारणात दिल्लीची चाटूगिरी करत आहे त्यामुळे बिल्डर-ठेकेदारांचे राज्य आले असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत विचारले असता, राऊत म्हणाले की, ज्या दिवशी अशी घोषणा होईल, तो मराठी संस्कृती आणि राजकारणातला “साडेचारवा मुहूर्त” असेल. त्यांनी वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली, भाजपच्या यशाचे श्रेय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला दिले.
