राजकारणात कोण साधू-संत असतं का, Sanjay Raut यांचा भाजपला सवाल
ते माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण मी कुणाचा कोथळा काढायची भाषा केली हे सांगायला पाहिजे ना?, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांना बाबासाहेब पुरंदेरंचं शिचरित्रं पाठवून देऊ. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे काय? हे समजून घ्यावं, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही खोचक टीका केली. कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा करा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.