Sanjay Raut | फोन टॅपिंग प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

| Updated on: Jul 20, 2021 | 4:36 PM

पेगासस प्रकरण उघड झाल्याने देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे असं या देशातील नागरिकांना वाटतं. अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि इतर कोणी असतील त्या प्रत्येकावर पाळत ठेवली जात आहे. त्यांची हेरगिरी केली जात आहे. हे काल स्पष्ट झालं आहे, असं राऊत म्हणाले.

Follow us on

नवी दिल्ली: पेगासस प्रकरणाचा जो भांडाफोड झाला आहे. त्यावरून या देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं उघड झालं आहे. हा देशाशी धोका आहे. देशातील जनतेशी धोका आहे. ही हेरगिरीच नाही तर विश्वासघातही आहे, असं सांगतानाच आम्ही या मुद्द्यावर संसंदेत आवाज उठवू. हिंमत असेल तर सरकारने आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करावी, असं आव्हानच शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलं आहे. पेगासस प्रकरणावरून शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आजही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्ला चढवला. पेगासस प्रकरण उघड झाल्याने देशात कोणीही सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे.