Sanjay Raut : त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? संजय राऊतांचा खोचक सवाल
Sanjay Raut PC : हिंदी भाषेच्या सक्तीवरून आज खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जो आदेश काढला त्याचे आम्ही होळी करणार आहोत. पहिला आदेश होता तर नवीन आदेश काढण्याचे काय गरज होती? त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? काय बोलत आहेत? असा खोचक सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही या आंदोलनामध्ये सगळ्यांना आमंत्रित केलं आहे याचा पहिला टप्पा आहे आणि महत्वाचा टप्पा आहे. देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो आदेश काढला आहे हिंदी सक्तीचा जो आदेश काढला आहे त्याची होळी करण्यात येणार आहे यात शिवसैनिक सामील नाही तर त्या त्या जिल्ह्यातील मराठी जनता साहित्य लेखक यांनाही आमंत्रित केला आहे. आज तीन वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत. मराठी मनगट कसं पेटलेले आहे हे आम्ही दाखविल्या शिवाय राहणार नाही.
Published on: Jun 29, 2025 11:46 AM
